fbpx

पाकिस्तानात आयईडी स्फोट : १६ जणांचा मृत्यू तर २४ जखमी

टीम महाराष्ट्र देशा :पाकिस्तानातील बलूचिस्तान प्रांतातील क्वेटा येथील हजरगंज परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटात 16 जण ठार झाले आहेत. भाजी मंडईत हा बॉम्बस्फोट झाला आहे. सकाळी आठ च्या दरम्यान हा बॉम्बस्फोट झाला आहे.

पाकिस्तानी मिडीयाने दिलेल्या व्र्त्तानुसार, आज सकाळी झालेल्या या बॉम्बस्फोटात १६ जण ठार झाले असून यामध्ये जवळपास आठजण हज़ारा समुदायाचे लोक होते. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

न्यूज एजन्सी एपीपीच्या मते, पोलिसांनी सांगितले की हा स्फोट बाजारात उभ्या असलेल्या पोलिस व्हॅनवर निशाना साधत करण्यात आला आहे. “बटाटाच्या गोडाऊन जवळ सुरक्षा सैन्याची गाडी पोहचली तेव्हा हा स्फोट झाला.” यामध्ये एका सैनिकाचा देखील मृत्यू झाला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.