राजकीय ताकद दाखवण्यासाठी विचारांनाही बंधक बनवण्यात आलं; आणीबाणीवर मोदींची टीका

pm-modi

टीम महाराष्ट्र देशा : आपली राजकीय ताकद दाखवण्यासाठी आणीबाणीमध्ये माणसांनाच नव्हे, तर त्यांच्या विचारांनाही बंधक बनवण्यात आलं होतं. आणीबाणी हा देशासाठी काळा दिवस असल्याचा म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर निशाना साधला आहे. १९७५ मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला आज ४३ वर्ष पूर्ण होत आहेत. हीच संधी साधत भाजपकडून आज देशभरात काळा दिवस पाळण्यात येत आहे. नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विटकरत निषेध व्यक्त केला.

देशात आणीबाणीला म्हणजे काळा दिवस असल्याच कायम लक्षात ठेवल जाईल, या काळामध्ये सगळ्याच संस्थामध्ये भीतीच आणि दडपशाहीच वातावरण निर्माण केलं गेलं. केवळ नागरिकांनाच नाही तर त्यांच्या विचारांवर देखील बंधने आणण्यात आल्याच ट्विट मोदी यांनी केले आहे.