१०८ प्राथमिक शिक्षकांना मिळणार आदर्श शिक्षक पुरस्कार

cm mh

वेबटीम : दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी राज्यातील १०८ प्राथमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. शिक्षकांना दरवर्षी पुरस्कार दिले जातात. या पुरस्काराचे वितरण १८ सप्टेंबरला सोलापूर येथे होणार आहे. यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती शिवानंद पाटील यांनी राज्य शिक्षक पुरस्कार व सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण सोहळा सोलापुरात करण्याची इच्छा मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली होती. त्यानुसार हा पुरस्कार वितरण सोहळा सोलापूर येथे होत असल्याचे समजते. राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह राज्यमंत्री, आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत. शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी पुरस्कार सोहळा सोलापुरात होत असल्यामुळे त्यादृष्टीने तयारी करण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी तयारी करू लागले आहेत.