fbpx

गिरीश बापट घेणार अजित पवारांचा आदर्श

ajit pawar and girish bapat 2

टीम महाराष्ट्र देशा : जिल्हा नियोजन समितीची बैठक विधानभवन येथे सुरु असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी पाहायला मिळाली. देवस्थानाला तिर्थक्षेत्राचा दर्जा देण्यावरुन चर्चा सुरु होती. त्यावेळी अजित पवारांनी गिरीश बापटांना कठोर राहण्याचा सल्ला दिला आणि त्याला लागलीच बापटांनी होकार दिला.

दरम्यान देवस्थानाला तिर्थक्षेत्राचा दर्जा देण्यावरुन अजित पवार गिरीश बापटांना म्हणाले , देवस्थान किती मोठे आहे, तेथे वर्षाला किती भाविक येतात, अशा सर्व गोष्टींचा विचार व्हायला हवा. कोणी मागणी केली म्हणून एखाद्या देवस्थानला तिर्थक्षेत्र म्हणून घोषीत करायला नको. त्यावर ,बापट म्हणाले, तिर्थक्षेत्र घोषीत करण्यासाठी नियमावली ठरविली आहे. या नियमावलीच्या आधारेच एखाद्या देवस्थानला तिर्थक्षेत्राचा दर्जा द्यायचा की नाही, हे ठरविले जाते. मात्र, अनेकदा देवस्थानला तिर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, यासाठी राजकिय दबाव टाकला जातो. त्यामुळे काही वेळेस नियम पाळले जात नाही.

बापट यांनी सांगितलेल्या कारणाला उत्तर देताना पवार म्हणाले, पालकमंत्र्यांनी कसे कठोर रहावे कठोर. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता, बापट म्हणाले, दादा आता तुमचा आदर्श घेतो आणि कठोर राहतो. यावर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

3 Comments

Click here to post a comment