Idea: आयडियाचीही ‘रोमींग फ्री’ सेवा

एयरटेलनंतर आता आयडिया कंपनीनेही आपल्या ग्राहकांना १ एप्रिलपासून ‘रोमींग फ्री’ सेवा देण्याची घोषणा केली आहे.

आपल्या सर्कलबाहेर गेल्यानंतर संबंधीत ग्राहकाला इनकमींग कॉलरवही ‘रोमींग’चे शुल्क अदा करावे लागते. गेल्या अनेक वर्षांपासून ‘रोमींग’च्या माध्यमातून ग्राहकांची लूट होत असल्याने ते रद्द करण्यात यावे अशी मागणी होत आहे. मात्र सेल्युलर कंपन्यांनी यावर कोणतीही कार्यवाही केली नव्हती. मात्र आता वाढत्या स्पर्धेत ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी एयरटेल कंपनीने अलीकडेच रोमींग चार्जेस रद्द करण्याची घोषणा केली होती. यानंतर आता आयडिया कंपनीनेही याच पध्दतीने आपल्या ग्राहकांना ‘रोमींग फ्री’ सेवा देण्याची घोषणा केली आहे. परिणामी देशभरातील सुमारे चार लाख शहरे आणि खेड्यांमधून या कंपनीचे ग्राहक एकमेकांना एकाच दरात कॉल करू शकणार आहेत. ही सुविधा इनकमिंग आणि आऊटगोइंग या दोन्ही प्रकारच्या ग्राहकांना प्रदान करण्यात आली आहे. दरम्यान, आयडिया कंपनीने आपल्या ग्राहकांना अत्यंत किफायतशीर दरात ‘इंटरनॅशनल रोमींग पॅक’ही जाहीर केले आहेत.