fbpx

जगातील एकमेव देश जिथे स्त्री – पुरुषांना समान वेतन दिले जाते

iceland-the-first-country-to-order-firms-to-prove-equal-pay

जगभरात स्त्रिया आणि पुरुष यांच्या वेतनात कमालीची तफावत आढळते. समान वेतन द्यावे या करता जगभ रात अनेक चळवळी देखील उभ्या करण्यात आल्या पण समान वेतन दिले जात नाही. महिला पुरुषाबरोबरीने कितीही काम करू देत पण वेतन कधीच समान दिले जात नाही.मात्र, एका देशानं या विचारसरणीलाच फाटा दिलाय.

‘आइसलँड’ या देशानं स्त्री आणि पुरुषांना समान वेतन देणारा पहिला देश बनण्याचा बहुमान मिळवलाय. यापुढे या देशातील कोणत्याही कंपनीत काम करणाऱ्या स्त्री आणि पुरुषांना समान वेतन मिळणार आहे.

जगभरात अजूनही कित्येक ठिकाणी एकसमान काम करुनही महिलांना पुरुषांपेक्षा कमी पगार मिळण्याची अनेक उदाहरणं सर्रास दिसतात. पण, आइसलँडनं मात्र ही प्रॅक्टीस हद्दपार करण्याचं ठरवलंय. महत्त्वाचं म्हणजे, लिंग समानतेच्या बाबतीत ‘आइसलँड’ जगात अव्वल स्थानावर आहे.

आइसलँडमध्येही आजवर एक समान काम करण्यासाठी पुरुषांना महिलांहून सहा टक्के अधिक वेतन दिलं जातं होतं. परंतु, सरकारनं ‘इक्वल पे स्टँडर्ड’ नावानं एक नवीन गाईडलाईन जारी केलीय. या गाईडलाईन अंतर्गत कंपनीच्या प्रत्येक कामाचं मूल्यांकन केलं जाईल…

त्यातून कोणतं काम किती महत्त्वाचं आहे, हे जाणून घेतलं जाईल. त्यानंतर प्रत्येक कामाला एक क्रमांक दिला जाईल. जर दोन व्यक्ती एकाच क्रमांक असलेलं काम करत असतील तर त्यांचं वेतनही समान असायला हवं. नव्या नियमानुसार, या दोन व्यक्तींचं वेतन मात्र समान नसेल तर कमी वेतन असलेल्या व्यक्तीचं वेतन वाढवलं जाईल.

1 Comment

Click here to post a comment