… तर भारत-न्यूझीलंड सामना होऊ शकतो रद्द, जाणून घ्या सामना का होणार रद्द

टीम महाराष्ट्र देशा : येत्या १३ तारखेला होणारा भारत आणि न्यूझीलंडचा आयसीसी वर्ल्ड कपचा सामना होणार नसल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे. इंग्लंडमधील लहरी वातावरण लक्षात घेता नॉटींगहॅम येथे गुरुवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने हा सामना होणार नसल्याचे वृत्त आले आहे.

९ जूनला आयसीसी वर्ल्ड कपचा भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात सामना झाला. या सामन्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर सफाईदार विजय मिळवला. त्यानंतर आता येत्या १३ तारखेला नॉटींगहॅम, ट्रेंट ब्रिज येथ मैदानावर भारत आणि न्यूझीलंडचा आयसीसी वर्ल्ड कपचा सामना होणार आहे. परंतु इंग्लंडमधील लहरी वातावरण लक्षात घेता नॉटींगहॅम येथे गुरुवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंडचा सामना होणार नसल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे.

विशेष म्हणजे, इंग्लंडमध्ये गेले दोन दिवस पाऊस पडत आहे आणि तेथील हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील काही दिवस असेच वातावरण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि गुरुवारी दुपारीही हलका पाऊस पडणार असल्याचे बोलले जात आहे.