अम्पायर रिचर्ड इलिंगवर्थ रुग्णालयात, नागपुरात उपचार सुरू

नागपूर : नागपुरात झालेल्या भारत- ऑस्ट्रेलिया पाचव्या एकदिवसीय सामन्यातील थर्ड अम्पायर रिचर्ड इलिंगवर्थ यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात हाती आलेल्या माहितीनुसार, नागपुरातील व्हीसीए स्टेडियमवर 1 ऑक्टोबर रोजी झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या एकदिवसीय सामन्यात रिचर्ड इलिंगवर्थ यांनी थर्ड अम्पायर म्हणून जबाबदारी पार पडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 ऑक्टोबर रोजी सकाळी रिचर्ड इलिंगवर्थ यांची प्रकृती खालावली.त्यामुळे त्यांना मानकापूर परिसरातील अॅलेक्सिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

आयसीसीच्या एलिट पॅनेलचे अम्पायर असलेले रिचर्ड एलिंगवर्थ यांनी इंग्लंडकडून वनडे व टेस्ट मॅचेसमध्ये प्रतिनधित्वही केले आहे. गेल्या 1 ऑक्टोबर रोजीनागपुरात झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया लढतीदरम्यान टीव्ही अम्पायर होते. रविवारी मॅच झाल्यानंतर सोमवारी पहाटेच्या सुमारास त्यांची प्रकृती खालवली.अॅलेक्सिस हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

Comments
Loading...