u-19 : जपान ४१ धावात ऑल आउट;भारतीय टीम क्वार्टर फायनलमध्ये

टीम महाराष्ट्र देशा : १९ वर्षाखालील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने अवघ्या २९ चेंडूत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना जपानचा संघ अवघ्या ४१ धावांत गारद झाला होता. त्यानंतर ४२ धावांचे अतिशय सोपे आव्हान भारताच्या सलामीवीरांनीच पार केले. जपानच्या फलंदाजांचा भारतीय गोलंदाजांनी अक्षरश: धुव्वा उडवला.

या सामन्यात टीम इंडियानं जपानचा संपूर्ण संघ ४१ धावांत तंबूत पाठवला. १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतील ही आतापर्यंतची नीच्चांक खेळी ठरली. भारतानं हा सामना एकही विकेट न गमवता जिंकला.

Loading...

जपानकडून एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. त्यांचे ५ फलंदाज शून्यावर बाद झाले. भारतीय संघाकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक ४, कार्तिक त्यागीने ३, आकाश सिंहने दोन विकेट घेतल्या. तर विद्याधर पाटीलने एक विकेट घेतली.

विजयासाठीच्या ४२ धावांचे लक्ष्य भारताने ४.५ षटकात एकही विकेट न गमवता पार केले. भारताकडून यशस्वी जैस्वालने नाबाद २९ तर कुमार कुशाग्रने नाबाद १३ धावा केल्या.

ग्रुप फेरीतील तीन पैकी दोन विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान या सामन्यात १९ वर्षाखालील वर्ल्ड कपमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा विक्रम जपानच्या नावावर नोंदवला गेला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'