आयसीसी दक्षिण आफ्रिका संघावर बंदी घालणार ?

South Africa

केप टाऊन : दक्षिण आफ्रिका संघावर मोठं संकट उभे राहिले आहे . देशांतील सरकारने दक्षिण आफ्रिकी क्रिकेट बोर्डाला सस्पेंड केल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे आयसीसी दक्षिण आफ्रिकेवर बंदी घालण्याची शक्यता आहे

दक्षिण आफ्रिकेच्या क्रीडा व ऑलिम्पिक समितीने एक पत्र लिहून सर्व बोर्ड अधिका-यांना पद सोडायला सांगितले आहे. SASCC ही दक्षिण आफ्रिकेची खास संस्था आहे जी देशाचे सरकार आणि क्रीडा महासंघ यांच्यात म्हणून काम करते. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या क्रीडा व ऑलिम्पिक समिती कडून क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या वादांबाबत चौकशी सुरू करण्यात आली . क्रिकेट दक्षिण आफ्रिकेविरोधात तपासणीचे निकाल समोर आल्यानंतरच निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान याआधीही दक्षिण आफ्रिकेपूर्वीही झिम्बाब्वेवरही आयसीसीने बंदी घातली होती. आयसीसीने बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यास दक्षिण आफ्रिका दुसर्‍या वेळी बंदी घालणारा पहिला देश होईल. 1970 ते 1990 या काळात वंशविवादामुळे या टीमवर बंदी होती.

महत्वाच्या  बातम्या

मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा आदेशाबाबत राज्य सरकार योग्य ती पुढील कार्यवाही करणार आहे – अशोक चव्हाण

अमृता फडणवीसांनी व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांनी केलेला पदाचा गैरवापर होतो का ?

एकनाथ शिंदेंच्या प्रयत्नांनी वाढणार का गडचिरोलीची सिंचन क्षमता ?