कसोटी क्रमवारीत कोहली ,पुजारा,रहाणे,अगरवालची मोठी झेप

टीम महाराष्ट्र देशा- बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाने २-० असा विजय मिळवला.कसोटी क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या गुणात वाढ झाली असून तो दुसऱ्या स्थानापर्यंत पोहचला आहे. तर कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे चौथ्या आणि पाचव्या स्थानापर्यंत पोहचले आहेत. तर भारताचा सलामीवीर मयंक अगरवालने पहिल्या 10 मध्ये झेप घेतली आहे.

इंदूर आणि कोलकाता येथील दिवस-रात्र कसोटी भारतीय संघाने डावाने जिंकली. भारतीय गोलंदाजांनी या मालिकेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. विशेषकरुन इशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी या त्रिकुटाने बांगलादेशी गोलंदाजांची भंबेरी उडवली.

फिरकीपटू रविचंद्रन आश्विननेही या मालिकेच चांगला मारा केला. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत त्याला या कामगिरीचा फायदा झालेला असून, तो नवव्या क्रमांकावर आला आहे.दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर असलेला जसप्रीत बुमराह चौथ्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर घसरला आहे.

Loading...