सुपर ओव्हर बाबतचा ‘तो’ वादग्रस्त निर्णय ICC कडून रद्द

टीम महाराष्ट्र देशा- २०१९ साली इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने न्यूझीलंडवर मात करत विजेतेपद पटकावलं. मात्र मर्यादीत षटकं आणि सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिल्यामुळे इंग्लंडला अधिक चौकारांच्या निकषावर विजेता जाहीर करण्यात आलं. आयसीसीच्या या निर्णयावर नंतर टीकाही करण्यात आली होती. अखेरीस आयसीसीने तो वादग्रस्त निर्णय रद्द केलेला आहे.

मर्यादित षटकांचा सामना अनिर्णित राहिल्यानंतर खेळल्या जाणाऱ्या सुपरओव्हरच्या नियमांत आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनं बदल केला आहे. नव्या नियमांनुसार मर्यादित षटकांमध्ये समान धावसंख्या झाल्यानंतर जोपर्यंत एक संघ अधिक धावा मिळवत नाही, तोपर्यंत सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

14 जूलैला 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 50-50 षटकांनंतर इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांनी प्रत्येकी 241 धावा केल्या होत्या. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघांनी प्रत्येकी 15 धावाच केल्या. त्यामुळे अखेर बाउंड्री काउंटच्या नियमाचा उपयोग करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या