#cricket : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

icc

क्रिकेट : कोरोनानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू करण्याच्या मूलभूत मार्गदर्शक सूचनांमध्ये आयसीसीने शुक्रवारी मुख्य वैद्यकीय अधिकारी नेमणूक करण्याची आणि सामन्यापूर्वी 14 दिवसीय वेगळ्या प्रशिक्षण शिबिराची व्यवस्था करण्याची तरतूद केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सर्वत्र क्रिकेट पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशाने सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. तर त्याच वेळी सर्वोच्च सुरक्षा प्रोटोकॉल राखण्याचे आदेश दिले. आयसीसीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्य वैद्यकीय अधिकारी किंवा बायोसेफ्टी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. हे अधिकारी सरकारी नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार असतील. तसेच प्रशिक्षण आणि स्पर्धा पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने बायोसेफ्टी योजना महत्वाची व जबाबदार असेल.

तसेच सामने खेळण्यापूर्वी 14 दिवस संघाला आयसोलेट करा. प्रत्येकाची तपासणी करा. कोरोनाच्या चाचण्या घ्या. आणि प्रवासाच्या आधी संघ कोरोनामुक्त आहे की नाही याची खात्री करून घ्या, असेही नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.

जगभारत कोरोनाने थैमान घातल्याने अनेक खेळांवर याचा परिणाम झाला आहे. क्रिकेटला देखील याचा मोठा फटका बसला आहे. अनेक नियोजित सामने आणि दौरे हे रद्द करण्यात आले आहेत. तर ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी20 विश्वचषक देखील रद्द करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

गब्बर इज बॅक : मोठ्या खेळीसाठी शिखर उत्सुक

मला अशक्य असे वाटत नाही ! विराट कोहलीने आपल्या फलंदाजीबाबत केला मोठा खुलासा

युवराज सिंगने संघ निवड समितीवर केले गंभीर आरोप, म्हणाला…