fbpx

रवींद्र जडेजा अव्व्ल स्थानी !

वेबटीम : भारताच्या रवींद्र जडेजाला एका कसोटी सामन्यासाठी निलंबित करण्यात आल्यानंतर जडेजाला एक चांगली बातमी मिळाली आहे. दुसऱ्या कसोटीत सामनावीर ठरल्यानंतर आयसीसीच्या कसोटी अष्टपैलू क्रिकेटपटुंच्या यादीत जडेजा पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. जडेजा आधीपासूनच आयसीसीच्या कसोटी गोलंदाजीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
दुसऱ्या कसोटीत जडेजाने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात चमकदार कामगिरी केली. त्याने फलंदाजी करताना ७० धावा केल्या तर गोलंदाजीमध्ये दोन्ही डावात मिळून ७ विकेट्स घेतल्या. असे करताना त्याने आयसीसी क्रमवारीत अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या यादीत अव्व्ल स्थानी असलेल्या शाकीब-अल-हसनला मागे टाकले.
श्रीलंका विरुद्ध भारतचा दुसरा कसोटी सामना जडेजाचा ३२ वा सामना होता, या सामन्यात त्याने त्याच्या कसोटी कारकीर्दतील १५० वा बळी घेतला.
जडेजा बरोबरच अजिंक्य राहणे आणि चेतेश्वर पुजारा यांची ही क्रमवारी सुधारली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात या दोघांनीही शतक लगावले होते. कसोटी क्रमवारीत पुजारा फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे तर राहणे ११ व्या क्रमांकावर आहे.