fbpx

आय सी सी रॅकिंगमध्ये भारताचा दबदबा.

स्वप्नील कडू – श्रीलंकेविरोधातील शानदार खेळानंतर भारतीय कसोटी संघातील खेळाडूंनी आय सी सीक्रमवारीतध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे.जडेजा कसोटी क्रिकेटच्या ताज्या क्रमवारीनुसार नं. 1 कसोटी गोलंदाज व अष्टपैलू खेळाडूंमध्ये नं1 खेळाडू बनला आहे.जुलै 2016 पासून आजपर्यंत खेळलेल्या 16 कसोटी सामन्यात जाडेजाने आतापर्यंत 87 विकेट घेतल्या असून 5 वेळा 5 विकेट तर 1 वेळा 10 विकेट घेतल्या आहेत.गोलंदाजीबरोबरच फलंदाजीमध्येही जडेजा भारतीय संघासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.जुलै 2016 पासून जाडेजाने फलंदाजीमध्ये 41 च्या सरासरीने धावा काढल्या आहेत.त्यात त्याच्या 7 अर्धशतकांचा वाटा आहे.जडेजा भारतीय संघासाठी सध्या उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे.
   जडेजासोबतच अश्विन कसोटी गोलंदाजीत तिसऱ्या स्थानी तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतही तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे.फलंदाजीतही कसोटी क्रमवारीत पुजारा तिसऱ्या कोहली पाचव्या तर रहाणे सहाव्या स्थानावर आहे.या सर्व खेळाडूंच्या दमदार कामगिरीमूळे भारतीय  कसोटी संघ नं.1 स्थानावर आरूढ झाला आहे.