ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील विजयाचा आयसीसीकडुन मोठा गौरव

मुंबई : संपुर्ण क्रिकेट जगताना उत्सुकता लागली आहे ती जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची. हा सामना १० दिवसावर ठेपुन आला आहे. भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघ इंग्लंडमध्ये पोहोचले आहे. यादरम्यान भारतीय संघासाठी मनोबल वाढवणारी एक घटना घडली आहे.

या वर्षी सुरुवातीला भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मिळवलेल्या विजयाचा आयसीसीने विशेष गौरव केला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२०-२१ ला आयसीसीने ‘द अल्टिमेट टेस्ट सिरीज’चा सन्मान दिला आहे. आयसीसीने ट्विट करुन याबद्दल माहिती दिली आहे. आयसीसीने सोशल मीडीयाद्वारे यासाठी मते मागवली होती. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२०-२१ ला ७ मिलीयन मते मिळाली.

दोन आठवड्यापुर्वी आयसीसीने ‘द अल्टिमेट टेस्ट सिरीज’ हा मान देण्यासाठी १६ मालिकांची निवड केली होती. या १६ मालिकातुन भारत-ऑस्ट्रेलिया २००१ आणि २०२०-२१, भारत विरुद्ध पाकिस्तान १९९९ आणि ऍशेस २००५ या मालिका अंतिम चार मध्ये पोहोचल्या होत्या. भारत-ऑस्ट्रेलिया २०२०-२१ आणि भारत विरुद्ध पाकिस्तान १९९९ मालिकने अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरित बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२०-२१ ने ‘द अल्टिमेट टेस्ट सिरीज’ चा मान पटकावला.

महत्वाच्या बातम्या

IMP