आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ मे महिन्यातील खेळडुंची नामांकने जाहीर

मुंबई : आयसीसीने जानेवारी २०२१ महिन्यापासुन प्रत्येक महिन्यात चांगली कामगीरी करणाऱ्या क्रिकेटपटुला आयसीसी ‘प्लेयर ऑफ द मंथ’ हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे. मे महिन्यातील पुरस्काराचे नामांकन नुकतेच जाहीर करण्यात आले. यात सलग दुसऱ्या महिन्यात भारतीय खेळाडुंचा समावेश नाहीये.

मे महिन्यात जाहिर केलेलल्या नामांकनात पुरुष गटात पाकिस्तान संघाचा हसन अली, श्रीलंका संघाचा प्रवीण जयविक्रमा आणि बांग्लादेश संघाचा मुशफिकुर रहिम यांना मानांकन मिळाले आहे. झिम्बाब्वे संघाविरुद्ध कसोटी मालिकेत हसन अलीने उत्कृष्ट गोलंदाजी करत ८.९२ च्या सरासरीने १४ गडी बाद केले होते. तर बांगलादेश संघाविरुद्ध श्रीलंकेचा गोलंदाज प्रवीणने कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात ११ गडी बाद केले होते. बांगलादेशचा यष्टिरक्षक फलंदाज मुश्फिकुर रहिमने श्रीलंकाविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत ७९ च्या सरासरीने २३७ धावा केल्या होत्या.

महिलाच्या गटात स्कॉटलंडची कॅथरीन ट्रेस, आयर्लंडची क्रिकेटपटू गॅबी लुईस आणि लीह पॉल यांना नामांकन मिळाले आहे. कॅथरीन ब्रेसने या काळात टी -२० सामन्यात ८५.१ च्या स्ट्राइक रेटने ९६ धावासह १४.६० च्या सरासरीने पाच गडी बाद केले आहे. तर गॅबी लुईसने ११६ च्या स्ट्राइक रेटने ११६ धावा केल्या आहेत. तर तिसरी खेळाडू लीह पॉलने ४.४४ च्या सरासरीने ९ गडी बाद केले आहेत. मात्र यादरम्यान एप्रिल महिन्यापासुन भारतीय संघाने एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळल्यामुळे भारतीय खेळाडुंना नामांकन मिळालेले नाही.

महत्वाच्या बातम्या

IMP