आयएएस अधिकाऱ्याने दोन जणांना चिरडले

four people dead in road accident at Beed

मुंबई  : मानखुर्दमध्ये नशेत असलेल्या एका आयएएस अधिकाऱ्याच्या गाडीने धडक दिल्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. मध्यरात्रीच्या सुमारास मानखुर्द पोलीस चौकी येथे दोन जण रस्त्यांने जात असतांना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आयएएस शक्तिविल राजू यांची गाडी वेगाने येत होती.

दरम्यान त्यांच्या गाडीने जोरदार धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी आहे. जखमी व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे