‘तो निर्णय माघे घ्या अन्यथा वाईट परिणाम होतील’; दबंग अधिकारी तुकाराम मुंडेना धमकी पत्र

Tukaram-mundhe pmpml

पुणे: धडाकेबाज कामामुळे कायम वादग्रस्त आणि चर्चेत असणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. हे पत्र पुणे शहरातील सुखसागर नगर या परिसरातून आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

धमकी पत्रामध्ये मुंडे यांच्या पीएमपीएल कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या काही काळात मुंडे यांनी पीएमपीएलमध्ये धडाकेबाज निर्णय घेतले आहेत जेष्ठांच्या पासमध्ये केलेली दरवाढ कमी करा अन्यथा परिणाम वाईट होतील, असे धमकी देणारे पत्र आज पीएमपीएमएलच्या कार्यालयात येऊन धडकले आहे.

पीएमपीला फायद्यात आणण्यासाठी मुंडे हे कठोर निर्णय घेण्यास कचरत नाहीत. परंतू त्यांचा हा निडरपणा त्यांच्या जिवावर बेततो की काय? अशी शंका निर्माण झाली आहे.