औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदी सुनील चव्हाण यांची नियुक्ती

पुणे: औरंगाबदचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पुण्याचे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आयएएस अधिकारी सुनील चव्हाण हे औरंगाबदचे नवीन जिल्हाधिकारी असणार आहेत.

सुनील चव्हाण हे सध्या ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत होते. आज राज्यभरातील अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी असणारे सौरभ राव यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर नवल किशोर राम यांची पुण्याचे जिल्हाधिकारी असणार आहेत.