‘आवाज बनावा म्हणून सनदी सेवा स्वीकारली पण व्यवस्थेने माझाच आवाज दाबला ‘

टीम महाराष्ट्र देशा :- ज्यांना आवाज नाही, त्यांचा आवाज होता यावा, म्हणून मी सनदी सेवेत प्रवेश केला होता. पण, येथे मीच माझा आवाज गमावून बसलो असल्याने आता या व्यवस्थेत माझा जीव रमत नाही, अशी खंत व्यक्त करीत आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन यांनी त्यांचा राजीनामा दादरा आणि नगर हवेली प्रशासनाकडे सादर केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. कन्नन गोपीनाथन हे सध्या ऊर्जा, नागरी विकास आणि कृषी विभागाचे सचिव होते. त्यांनी बुधवारी (ता. २१ ) गृह सचिवांना पत्र लिहिले असून, प्रशासकीय सेवेतून मुक्त होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.

मला माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे आहे. मी दुसऱ्यांचा आवाज बनू शकेल, या विश्वासाने मी प्रशासकीय सेवेत दाखल झालो. पण, इथे तर मी माझ्याच आवाजाचा वापर करू शकत नाही. राजीनाम्यानंतर मला माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य पुन्हा मिळू शकेल,” अशी भावना गोपीनाथन यांनी व्यक्त केली. माझ्या या निर्णयाचा काहीही परिणाम होणार नाही, हे मला माहीत आहे. याची काही काळ केवळ बातमी’ होईल. मात्र, याची किंमतही खूप मोठी आहे. माझ्या सदसद्विवेकबुद्धीनुसार मला पाऊल उचलायचे आहे,” असेही त्यांनी सांगितले.

Loading...

आपली मते खुलेपणाने व्यक्त करता न येणे, काश्मीरमधील नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेणे आणि ही घटना कोणत्या दुसऱ्या देशात घडल्याप्रमाणे देशवासीयांचे त्याकडे निष्क्रियपणे पाहणे, यामुळे व्यथित झाल्याने कन्नन गोपीनाथन राजीनामा देण्याच्या निर्णयाप्रत पोचल्याचे सूत्रांनी सांगितले.

राजीनाम्याच्या कारणाबद्दल त्यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटही केले आहे. नागरी सेवा म्हणजे बरोबर असलेल्या नागरिकांसाठी अधिकारांचा वापर आणि स्वातंत्र्याची संधी, असे मला वाटत होते, असे ट्विट त्यांनी सुरवातीला केले.

त्यानंतरच्या ट्विटमध्ये त्यांनी हॉंगकॉंगच्या अर्थव्यस्थेविषयी भाष्य करणारी लिंक शेअर करीत स्वातंत्र्य आणि लोकशाहीशिवाय त्यांच्या संपत्तीला काही अर्थ नाही, हे हॉंगकॉंगने जाणले आहे, असे सांगत त्याचा संबंध देशातील स्थितीशी जोडला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
तानाजी चित्रपटातील 'तो' आक्षेपार्ह भाग वगळावा; नाभिक समाजाची मागणी
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले