मुंबई : आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठीचा खेळाडूंचा लिलाव गुरुवारी (१८ फेब्रुवारी) चेन्नई येथे संपन्न झाला. या लिलावामध्ये अनेक अनेक दिग्गज खेळाडूंचा लिलाव झाला तर काही खेळाडू ‘अनसोल्ड’ म्हणजेच विकले गेले नाहीत.
यातच न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याने होणाऱ्या आयपीएलवर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, तशीच वेळ आली तर पैशांसाठी आयपीएल क्रिकेट लीगमध्ये खेळण्याऐवजी मी देशासाठी कसोटी खेळणे पसंत करीन, असे देशप्रेमी वक्तव्य केन विलियम्सन यांने केले आहे. न्यूझीलंड संघ 2 जून आणि 14 जूनला लॉर्ड्स व एजबॅस्टनवर इंग्लंडविरुद्ध कसोटी सामने खेळणार आहे.
पण त्याच काळात जूनपर्यंत इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) खेळवली जाण्याची शक्यता आहे. त्याबाबत विचारले असता विलियम्सन म्हणाला, लीग क्रिकेटपेक्षा मी नेहमीच देशाच्या संघासाठी खेळायला प्राधान्य देण्याच्या भूमिकेत असणार आहे. त्यामुळे तशीच वेळ आली तर आयपीएल सोडून न्यूझीलंड संघाच्या सेवेत मी स्वतः सहभागी होईन असे विलियम्सन म्हणाला.
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीला अजून एक धक्का ; छगन भुजबळ यांनाही कोरोना संसर्ग
- टीम इंडियात निवड होताच सुर्यकुमारची तुफानी खेळी; असा केला आनंद साजरा
- माहिती आयुक्तांनी विद्यापिठाच्या सहायक कुलसचिवांना ठोठावला दंड
- छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण; स्वत: ट्विट करून दिली माहिती
- ‘…एक असा जोडीदार असणं’, कोहलीने केलं बायको अनुष्काचं तोंडभरुन कौतुक