पंतप्रधान पदाचे दावेदार शरद पवारांच्या विरोधात लढायला आवडेल- संजय काकडे

sanjay kakade and sharad pawar

पुणे: “शरद पवारांच्या विरोधात लढायला मला आवडेल आणि यामध्ये मी हारलो तरी मला आनंद होईल. कारण पंतप्रधानांच्या शर्यतीमध्ये असलेल्या उमेद्वारासोबत माझी लढत होण हे माझे भाग्यचं आहे”. असे राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी स्पष्ट केले. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलते होते.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत मी असो किंवा भारतीय जनता पक्षाचा कोणीही उमेदवार तो साडेतीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वास खा.संजय काकडे यांनी व्यक्त केला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत पुण्यातील ८ पैकी ४ आमदारांचे भवितव्य धोक्यात असल्याचा इशाराही काकडेंनी दिला. याचबरोबर आगामी लोकसभा निवडणूक आपण पुण्यातून नक्कीच लढणार असल्याचा ठाम विश्वास राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केला आहे.

संजय काकडे हे सध्या भाजपचे राज्यसभेतील सहयोगी सदस्य आहेत. मागील वर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीत काकडे यांनी चमत्कार करत भाजपला सत्तास्थानी आणले. त्यानंतर काकडे यांच्यावर मुख्यमंत्री देखील खुश असल्याचे दिसत आहेत. दरम्यान मध्यंतरी खासदार अनिल शिरोळे आणि काकडे यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे एकेकाळचे पुण्याचे किंगमेकर समजले जाणारे सुरेश कलमाडी यांच्याशी देखील काकडे यांची बैठक झाली होती.

आपण आजवर पक्षासाठी केलेले काम पाहता पक्ष नक्कीच आपला विचार करेल असा विश्वास देखील काकडे बोलून दाखवत आहेत. त्यामुळे आता अनिल शिरोळेना डावलून भाजप संजय काकडेंना उमेदवारी देणार का ? हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.