‘मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सोबत नेलं असते तर आनंद झाला असता’ : देवेंद्र फडणवीस

devendra

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी तासभर पंतप्रधानांशी चर्चा केली. त्यानंतर अर्धा तास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली आहे. या भेटीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी त्यांनी मोदी-ठाकरे भेटीचं स्वागत केलं. मोदी आणि ठाकरे यांची व्यक्तिगत भेट झाली की नाही मला माहीत नाही. झाली असेल तर चांगलेच आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो. अशा भेटीमुळे राज्याला फायदाच होईल, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कोणतंही शिष्टमंडळ जेव्हा पंतप्रधानांना भेटायलं जातं. तेव्हा शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये एकांतात चर्चा होत असते, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

पंतप्रधानांसोबतच्या भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला नेलं असतं तर आनंदच झाला असता, असं मत फडणवीस यांनी यावेळी मांडले. यासोबतच, ‘मला वाटतं ही पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांची व्यक्तिगत भेट झाली असेल तर चांगले गोष्ट आहे. मोदींचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या भेटी होत होत्या, असे संबंध असले पाहिजे. त्याचा महाराष्ट्राला फायदा होईल. राजकारणात जर तरला अर्थ नसतो. ते सत्तेत आहेत आम्ही विरोधात आहोत, हेच सध्या सत्य आहे,’ असं फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या