योग्यवेळी मार्गदर्शन मिळालं असतं तर आणखी चांगला क्रिकेटर झालो असतो ; सेहवागने व्यक्त केली खंत

सेहवागने

मुंबई : भारतीय संघाचा सर्वांत यशस्वी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने  त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतला एक मोठा खुलासा केला आहे. त्याने योग्यवेळी योग्य मार्गदर्शन मिळालं असतं तर आणखी चांगला खेळ करु शकलो असतो अशी खंत व्यक्त केली.

सेहवागने क्रिकगुरू ऍप लॉन्चवेळी या गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, ”मी जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आलो. तेव्हा अनेकांनी माझ्या फुटवर्कवर टीका केली होती. पण कोणीच मला त्यात सुधार आणण्याबाबत काही सांगितले नाही. अखेर पतौडी, सुनील गावस्कर आणि क्रिस श्रीकांत यांनी मला फुटवर्कमध्ये सुधारणेबाबत चांगले सल्ले दिले. ज्यामुळे मी माझ्या खेळात बराच सुधार आणू शकलो. पण हेच सल्ले मला आधी मिळाले असते तर मी आणखी धावा करुन खेळ सुधारु शकलो असतो.”

सेहवाग हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी सलामीवीर आहे. त्याने 104 कसोटी सामन्यांमध्ये 49.34 च्या सरासरीने 8586 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सेहवागची दोन तिहेरी शतके आहेत. त्याने एकूण 23 शतके आणि 32 अर्धशतके झळकावली. सेहवागने 251 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि 8273 धावा केल्या. त्याची सरासरी 35.06 होती. सेहवागने वनडेमध्ये 15 शतके आणि 38 अर्धशतके झळकावली. एकदिवसीय सामन्यात त्याने दुहेरी शतकही केले. याशिवाय सेहवागने 19 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 21.88 च्या सरासरीने 394 धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या

IMP