मी शरद पवारांसोबत जाणारचं… रामदास आठवले म्हणतात

blank

टीम महाराष्ट्र देशा : येत्या काही दिवसातच राज्यसभेची निवडणूक होईल.या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून माझी उमेदवारी निश्चित आहे,आणि त्या निवडणुकीत मी निवडून जाईल.त्याबरोबरच विरोधकांकडून शरद पवार राज्यसभेवर निवडून येणार आहेत. त्यामुळे राज्यसभेत मी देखील शरद पवार यांच्यासोबतच येणारच, अशी भूमिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

आपण राज्यसभेवर जाणार असल्याचा पुनरूच्चार केला. ते म्हणाले, केंद्रात भाजपाबरोबर आम्ही सत्तेत आहोत. गेल्या दोन निवडणुका आम्ही एकत्रित लढलो आहोत. या दोन्ही निवडणुकांत आरपीआयच्या मदतीने केंद्रात लोकाशाही आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळे राज्यसभेवर मला उमेदवारी मिळणार या शंका नाही,आज पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी आपली भूमिका मांडली.

त्याबरोबरच कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी सर्वच गुन्हे मागे घ्यावेत. कोरेगाव-भीमा मधील दंगल केवळ तीन तासांची होती. त्यानंतर राज्यात कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. या प्रकरणाचा राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत करण्यात येणारा तपास नियमाप्रमाणे होत आहे. त्यात कुणी आक्षेप घेण्याचे कारण नाही. या साऱ्या प्रकरणाचा तपास राज्य सरकार त्यांच्या पातळीवर स्वतंत्रपणे करू शकते, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणात पुणे पोलिसांवर करण्यात येणारे आरोप चुकीचे आहे. पालिसांनी कुणावरही अन्याय केलेला नाही, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.