सगळा अनुभव पणाला लावणार आणि १७५ जागा जिंकणार; अजित पवारांचा निर्धार

ajit pawar

टीम महाराष्ट्र देशा :  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठ विधान केले आहे. सोलापूरमधील पत्रकार परिषदेत त्यांनी आपला संपूर्ण अनुभव पणाला लावून येत्या निवडणुकीत १७५ जागा जिंकणार असं विधान केले आहे.

अजित पवार हे सध्या सोलापूरच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ते विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ‘आगामी विधानसभेला ३० वर्षांचा अनुभव पणाला लावून विधासनसभेच्या १७५ जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे अस अजित पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पुढे बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेत आली तर स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये ७५ टक्के आरक्षण देणार असून, त्यासाठी कायदा करणार असल्याचंही अजित पवार यांनी जाहीर केले.