मी उद्याच शपथ घेणार – येडीयुरप्पा

येडीयुरप्पा यांची विधिमंडळ नेतेपदी निवड,उद्या घेणार शपथ

टीम महाराष्ट्र देशा- कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष दावा करत असताना आता भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बीएस येडीयुरप्पा हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. बीएस येडीयुरप्पा यांनी स्वतः माहिती दिली आहे. कॉंग्रेसने जेडीएस ला दिलेला पाठींबा मान्य नसल्याचं सांगत कॉंग्रेसवर त्यांचाच पक्षातील नवनिर्वाचित लिंगायत आमदारांनी नाराजी दर्शविल्यामुळे कर्नाटक मध्ये कॉंग्रेसपुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे सात जेडीएसचे चार आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आल्याने कर्नाटक निवडणुकीत आणखी रंगत आली आहे.

येडीयुरप्पा यांची आज सकाळी विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. राजभवनाकडे येडीयुरप्पा यांनी प्रस्थान केलं असून कर्नाटकमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेष म्हणजे सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष दावा करत आहेत.

दरम्यान,कर्नाटकमधील राजकीय पेच सुटण्याचे नाव घेताना दिसत नाही. बहुमतासाठी आवश्यक जागा मिळवण्यात भाजपाला अपयश आले असले तरी त्यांच्याकडून सत्ता स्थापण्याचा पुरेपर प्रयत्न होत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि जेडीएसने आघाडी करून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. दरम्यान, एका काँग्रेस आमदाराने पाठिंब्याच्या बदल्यात भाजपाने आपल्याला मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अमरगौडा पाटील असे या काँग्रेस आमदाराचे नाव आहे.

Gadgil