‘छपाक’ला करमुक्त करण्यासाठी मी सरकारमध्ये भूमिका घेणार – जितेंद्र आव्हाड

टीम महाराष्ट्र देशा : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आंदोलनाला भेट दिली होती. मात्र या भेटीनंतर दीपिकावर कौतुकाचा वर्षाव तर टीकेची झोड उठली आहे. तसंच भाजप नेते आणि समर्थकांनी देखील तिला ट्रोल करण्यास सुरू केलंं होत. या सर्व गोष्टींना दीपिकाला सामना करावा लागला. शुक्रवारी दीपिकाचा ‘छपाक’ तर अजय देवगणचा ‘तान्हाजी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामुळे हे दोन्ही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची स्पर्धा लागली आहे. परंतु दीपिकाने जेएनयू आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे काही संघटनांकडून ‘छपाक’ला विरोध करण्यात येत आहे. तसंच ट्रोलर्सनी तिच्या या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची देखील मोहीम राबवली आहे. तर दुसऱ्या बाजूला ‘तान्हाजी’ या चित्रपटाचं प्रमोशन केलं जात आहे.

मात्र याचदरम्यान, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी छ्पाकला करमुक्त करावे म्हणून पुढाकार घेतला आहे. ‘स्त्रियांचे शोषण आणि अत्याचार यामध्ये देशात प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. छ्पाक चित्रपटामध्ये ॲसिड हल्ल्यामधून बचावलेली तरूणी आणि तीचा समाजाशी संघर्ष याचे कथानक करण्यात आले आहे. या चित्रपटाला करमुक्त (Tax Free) करावे अशी मी सरकारमध्ये भूमिका घेणार आहे.’ अस ट्विट करत आव्हाड यांनी आपली भूमिका मंडळी आहे.

Loading...

तर तिकडे दीपिकाचा ‘छपाक’ हा चित्रपट फ्लॉप करण्याच्या हेतूने मध्यप्रदेश मध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून ‘तान्हाजी’ या चित्रपटाची तिकीटं मोफत वाटली आहेत. तर दुसऱ्या बाजूला युवक काँग्रेसकडून ‘छपाक’ या चित्रपटाची तिकिटं मोफत वाटली जातं आहे. याशिवाय उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ‘छपाक’ चित्रपट दाखवण्यासाठी संपूर्ण थेअटर बुक केलं आहे. त्यामुळे या राजकीय वादात सर्वसामान्यांना दोन्ही चित्रपट मोफत पाहण्यास संधी मिळतं आहे.

दरम्यान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि पुद्दुचेरी या काँग्रेसशासित तीन राज्यात दीपिका पदुकोणचा छपाक सिनेमा करमुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र देखील आता अशी मागणी होत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
देशातील 10 बँकांचे होणार विलीनीकरण, १ एप्रिलपासून प्रक्रियेला होणार सुरवात
#corona : केवळ लॉकडाऊन पुरेसे नाही, WHOने सुचवला आणखी एक पर्याय
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा