निवृत्तीबाबत युवराजसिंगचा मोठा खुलासा; 2019 च्या अखेर निर्णय घेणार

I will take a call when that year is over. Everybody has to take a decision after a while. I have been playing international cricket since 2000, it has been almost 17-18 years on and off. So, I will definitely take a call after 2019: Yuvraj Singh

वेबटीम – फिटनेस आणि खराब फॉर्ममुळं संघाबाहेर असेलेल्या युवराज सिंगने निवृत्तीबद्दलचे संकेत दिले आहे. 2019 मध्ये होणाऱ्या विश्वचषकच्या संघात स्थान मिळण्यासाठी सध्या युवराज कठोर प्रयत्न करत आहे. युवराज सिंग हा भारतीय क्रिकेट संघातील एक प्रमुख डावखूरा फलंदाज आहे. 2000 सालापासुन तो भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा सदस्य आहे. 2003 मध्ये त्याने पहिला कसोटी सामना खेळला. 2007 ते 2008 पर्यंत तो भारतीय एकदिवसीय संघाचा उपकर्णधार होता. 2011 च्या क्रिकेट विश्वचषकात त्याला मालिकावीर म्हणून घोषित केले होते. 2007 चा टी ट्वेन्टी आणि 2011 च्या वर्ल्ड कप मध्ये युवराज सिंग चा खूप मोलाचा सहभाग होता.

काय म्हणाला युवाराज सिंग-

मी 2019 वर्षाच्या अखेरीस महत्त्वाचा असा निर्णय घेईन. प्रत्येकाला कधी ना कधी हा निर्णय घ्यावा लागणारच आहे. जवळपास 2000 सालपासून मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. त्या गोष्टीला आता 17-18 वर्षे झाली. त्यामुळे आता 2019 च्या अखेर त्याविषयीच्या निर्णय घेईन’  

I will take a call when that year is over. Everybody has to take a decision after a while. I have been playing international cricket since 2000, it has been almost 17-18 years on and off. So, I will definitely take a call after 2019: Yuvraj Singh

Loading...

अविस्मरणीय खेळी –

2007 मधील टी20 विश्वचषकातील ती फटकेबाजी अविस्मरणीय होती. युवराजने 2007 च्या टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारण्याची कामगिरी केली. षटकामध्ये सहाही चेंडूंवर युवराजने सहा षटकार ठोकत संघाच्या धावसंख्येत ३६ धावांची भर घातली होती. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला. त्याची ही इनिंग क्रिकेटच्या इतिहासात कायमच प्रशंसनीय ठरली.  2007 चा टी ट्वेन्टी आणि 2011 च्या वर्ल्ड कप मध्ये युवराज सिंग चा खूप मोलाचा सहभाग होता. युवराजने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदविताना पन्नास धावा करण्यासाठी फक्त १२ चेंडू घेतले आहेत.

Loading...

Loading...

वैयक्तिक जीवन-

युवराज सिंग याचा जन्म पंजाब येथे 12 डिसेंबर 1981 मध्ये झाला. युवराज हा माजी वेगवान गोलंदाज आणि पंजबी अभिनेते योगराजसिंग आणि शबनम सिंग यांचा मुलगा आहे. त्याचे आई-वडिल घटस्फोटित आहेत. युवराज त्याच्या आई सोबत राहतो. टेनिस आणि रोलर स्केटिंग बालपणामध्ये युवराजच्या आवडत्या क्रीडा होत्या आणि दोन्ही खेळात तो चांगला होता. त्याने राष्ट्रीय U14 रोलर स्केटिंग स्पर्धा जिंकली होती.

पण त्याच्या वडिलांनी त्याचे पदक फेकून दिले आणि स्केटिंग विसरून क्रिकेट वर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याला सांगितले. ते प्रत्येक दिवस युवराजचे प्रशिक्षण घेई. त्याने चंदीगड मध्ये डि.ए.व्हि. सार्वजनिक शाळेत शिक्षण घेतले. युवराजने ‘मेहंदी सांगा दी’ आणि ‘पुट सरदार’ अश्या चित्रपटात बालकलाकार म्हणून सुद्धा काम केले आहे. युवराज सिंग चा 12 नोव्हेबर 2015 ला हेजल किच या बॉलिवूड अभिनेत्री सोबत विवाह झाला आहे.

कारकीर्द- 

युवराज ने एकदिवसीय क्रिकेट मध्ये 3 ऑक्टोबर 2000 मध्ये केनिया विरुद्ध पदार्पण केले. त्याने त्याची पहिली कसोटी ही 16 ऑक्टोबर 2003 मध्ये न्यूजीलैंड विरुद्ध खेळला. 2005 चे इंडियन ऑइल कप युवराज साठी टर्निंग पॉईंट ठरला.

युवराज डावखुरा आक्रमक बॅट्समन म्हणून नावारुपाला आला. युवराज जेंव्हा फॉर्मात असतो तेंव्हा आपल्या बॅटिंग ने सर्वांना मंत्र मुग्ध करून टाकतो. युवराज स्पिन गोलंदाची पण करतो शिवाय तो एक उत्तम फिल्डर पण आहे. 1999 नंतर युवराज ने चांगली फिल्डींग करून सगळ्यात जास्त रन आउट केल्याचा विक्रम त्याच्या नावे आहे.

कॅन्सर

2011 मध्ये त्याला त्याच्या डाव्या फुफ्फुसाचा एक कर्करोगाच्या गाठीचे निदान झाले. कर्करोग संशोधन संस्था तसेच वैद्यक सुविधा येथे केमोथेरपीच्या उपचार त्याने करून घेतले आहे.

मार्च 2012 मध्ये युवराजला केमोथेरपीच्या उपचार पूर्ण केल्यानंतर हॉस्पिटलमधुन मुक्त करण्यात आले आणि एप्रिल महिन्यात तो भारतामध्ये परत आला. न्यूझीलँड विरुद्ध् टि-२० सामन्यात सप्टेंबर महिन्यात तो क्रिकेटमध्ये पुन्हा परतला.

पुरस्कार

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सन 2012 मध्ये युवराज सिंगला भारतातील दुसऱ्या सर्वोच्च क्रीडा अर्जुन पुरस्कार बहाल केला. 2014 मध्ये युवराज ला “पद्मश्री” पुरस्कार देऊन गौरवन्यात आले.

युवराज सिंह त्याच्या करिअरविषयी नेमका कोणता महत्त्वाचा निर्णय घेणार, याकडेच आता लक्ष लागून राहिलं आहे.

1 Comment

Click here to post a comment