fbpx

भाजपचाच प्रचार करणार : पुत्राच्या बंडखोरीनंतर दिलीप गांधी यांची प्रतिक्रिया

टीम महाराष्ट्र देशा: अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून सुजय विखेंना उमेदवारी दिली आहे. यामुळे गांधी समर्थक नाराज आहेत तसेच सुपुत्र सुवेंद्र गांधी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु दिलीप गांधी यांनी पक्षाने जो उमेदवार दिला आहे, त्याचा प्रचार करणार आहे. भाजपच्या विचारानेच पुढे जाणार असून पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू असे मत कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले.

भाजपाने तिकिट नाकारल्यामुळे गांधी समर्थकांचा आज मेळावा पार पडला. यावेळी बोलताना गांधी म्हणाले,सुवेंद्रला त्याचा विचार करण्यास स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्याने त्याचा निर्णय घेतला आहे . मी मात्र भाजप सोडणार नाही. आम्हाला देशाला पुढे न्यायचे आहे. त्यासाठी पक्ष देईल ती जबाबदारी पार पडण्यास मी तयार आहे. भाजपने दिलेल्या उमेदवाराचा प्रचारही मी करणार आहे. यावेळी अभय आगरकर यांच्यावर गांधी यांनी टीका केली. दुस-याच्या घरात राहून आलेल्यांना पतिव्रता कसे म्हणता येईल, अशी टीका त्यांनी आगरकरांवर केली.

येणाऱ्या काळात नगरच्या राजकारणात दिलीप गांधींचा रोल महत्वाचा आहे. दिलीप गांधींनी घेतलेल्या या निर्णयामुळे भाजपला आणि सुजय विखेंना नक्कीच फायदा होणार आहे.