Amol Kirtikar | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते गजानन कीर्तिकर (gajanan Kirtikar) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) हे उद्धव ठाकरे गटातच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तरीसुद्धा अमोल कीर्तिकर काय भूमिका याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच अमोल यांनी केलेल्या वक्तव्याने प्रश्नचिन्ह पुसून टाकला आहे.
माझ्या वडिलांनी शिवसेना सोडली असली तरी मी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेसोबतच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात पक्ष वाढवण्यासाठी काम करत राहणार, असं अमोल कीर्तिकर यांनी म्हटलं आहे.
तसेच, गजानन कीर्तिकर यांची घरी समजूत काढली होती का?, असा सवाल अमोल यांना करण्यात आला होता. गजानन कीर्तिकर हे माझे वडील आहे, त्यांनी त्यांचा निर्णय घेतला. पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी उद्धव ठाकरे यांना भेटून शिवसेनेसोबतच राहणार आहे, असं अमोल कीर्तीकर म्हणाले. तसेच पक्ष वाढवण्यासाठी महाराष्ट्रात काम करणार आहे. मागील दोन दिवसांमध्ये शिवसैनिकांचं प्रेम मिळत आहे. फोन करून लोकं सोबत असल्याचे सांगत आहे. त्यांच्या विश्वासाला तडा देणार नाही, असं देखील ते म्हणाले होते.
दरम्यान, मी युवासेनेत काम करतोय, जर एखादा कार्यकर्ता नाराज झाला असता तरी त्याची समजूत काढली असती., त्या पद्धतीने निर्णय घेतला, आता गजानन कीर्तिकर यांचा विषय माझ्यासाठी संपला आहे, असं अमोल म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | “महागाई कमी झाली हो!”, सामनातून संजय राऊतांचा हल्लाबोल
- Kirit Somaiya | “ठाकरे सरकारने कोर्टाची फसवणूक केली, खोटे बोलले” ; किरीट सोमय्यांचा मोठा आरोप
- Sushma Andhare | “दोन बारक्या पोरांवर मी बोलणार नाही”, सुषमा अंधारेंचा राणेंना खोचक टोला
- Sushma Andhare | “लाव रे तो व्हिडीओ हा त्यांचा…”, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर घणाघात
- Ajit Pawar | “दारू पिता का…” ; अजित पवारांनी घेतला अब्दुल सत्तारांचा समाचार