‘अजित पवारांनी सही केलेला कागद दाखवणार’, किरीट सोमय्यांचा दावा

ajit pawar

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाच्या धाडी पडलेल्या असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता एक दावा केला आहे. अजित पवारांनी सही केलेला कागद दाखवणार असा दावा सोमय्या यांनी केला आहे.

अजित पवारांची एवढी समृद्धी आहे की किरीट सोमय्यांनी पाहायला यावं असे मेसेज फिरतात, तर त्यांच्या कारस्थानाचा एक नमुना आज मी जनतेसमोर आणणार आहे. ठाकरे, पवार यांनी दीड वर्षात अनेक घोटाळे केले, मंत्रालयासमोर बॅनर लावले, माझ्या कुटुंबियांवर आरोप केले, तर उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यात हिम्मत असेल तर माझे घोटाळे बाहेर काढा, चौकशी करा, शिक्षा करा. तुमचे दोन डझन नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले, सातव्या दिवशीही घोटाळे बाहेर निघत आहे. असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

दरम्यान आज किरीट सोमय्या १ वाजता हसन मुश्रीफ यांचा १५०० कोटी ग्राम पंचायत कॉन्ट्रॅक्ट घोटाळा याची पुणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार आणि स्टेटमेंट नोंदवणार असल्याचे त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या