…’तर मी राजीनामा देईन’, भाजपच्या ‘या’ तरुण आमदाराने दाखवली राजीनाम्याची तयारी

bjp flag

टीम महाराष्ट्र देशा : भीमा -कोरेगाव प्रकरणात माझ्यावर कोणतेही गुन्हे नाहीत. विरोधकांनी केलेल्या आरोपात काहीच तथ्य नाही. आधारहीन आरोपांबाबत काहीच बोलू शकत नाही. माझ्यावर गुन्हा सिद्ध करावा अथवा आरोप करणाऱ्यांनी पुरावे दिल्यास मी तत्काळ राजीनामा देईन, असा इशारा माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी दिला आहे. संविधानाच्या चौकटीला अनुसरून नव्या सरकारने तरुणांवरील गुन्हे माफ करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संविधानाच्या विरोधात माझा बाप उभारला, तरीही मी माफ करत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

उदरनिर्वाहानिमित्त माझे कुटुंब गावोगावी फिरत पुण्यात स्थायिक झाले. मात्र, माळशिरस तालुक्याच्या मातीशी नाळ तुटली नाही. आता आमदार म्हणून काम करण्याची संधी जनतेने दिली. आगामी पाच वर्षांत शेतकरी, सुशिक्षित तरुण, कुस्तीगीरांसह महिलांचे प्रश्न सुटतील, असा विश्वास आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केला.

मी चळवळीतून पुढे आलेला कार्यकर्ता असल्याने जनतेत घुसून काम करण्याची तयारी ठेवली आहे. तालुक्यातील रस्ते, पालखी मार्ग आणि बेरोजगारी ही समस्या सोडविण्यावर भर असेल. नागरिकांच्या समस्या खूप छोटी असते. मात्र, ती सुटण्यासाठी वेळ लागतो. त्यांच्यासाठी मी उपलब्ध असेन, अस देखील सातपुते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या