उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर बांद्र्यात जाऊन देणार : नारायण राणे

blank

टीम महाराष्ट्र देशा : कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात चांगलीचं चुरस पाहिला मिळत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कणकवली येथील सभेतून नारायण राणे यांना चांगलेचं लक्ष्य केले होते. यावरून नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषेद घेत भाष्य केले आहे.

नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना केवळ माझ्यावर टीकाचं करायची होती तर एवढ्या लांब कशाला आले. मात्र मी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार बांद्र्यात जाऊन घेणार आहे. उद्धव ठाकरे यांनी १७ मिनिटांच्या भाषणात १५ मिनीटे फक्त माझ्यावर टीका केली, असे ते म्हणाले.

राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन केला आहे. भाजप – शिवसेना राज्यात युती करून लढत असली तरी कणकवलीत ही युती तुटली आहे. कारण भाजप उमेदवार नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेनेने आपला अधिकृत उमेदवार सतीश सावंत यांना उभे केले आहे. त्यामुळे युती असूनही राणे यांना कणकवलीत शिवसेनेशी सामना करावा लागणार आहे.

दरम्यान नारायण राणे यांच्यावर शिवसेनेकडून जोरदार टीका करण्यात आली. त्यामुळे सिंधुदुर्गतील राजकीय वातावरण चांगले तापले होते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला मानत राणेंनी शांत राहणे पसंत केले. शिवसेनेवर टीका करणार का, असे विचारता त्यांनी नंतरचे नंतर बघू. मी आधी काय टीका केली ते पाहतो, असे सांगत विषय टाळला होता.

महत्वाच्या बातम्या