fbpx

लोकसभा निवडणूक होईपर्यंत आपण काहीच बोलणार नाही – सतेज पाटील

patil

टीम महाराष्ट्र देशा : आपले ध्येय निश्चित आहे, त्या मार्गाने आपली वाटचाल सुरू आहे, अशी सावध प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी दिली. लोकसभा निवडणूक होईपर्यंत आपण काही बोलणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

तपोवन मैदानावर भरविण्यात येणाऱ्या कृषी प्रदर्शनांची माहिती देण्यासाठी आ. पाटील यांनी आज पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल चर्चा उपस्थित झाली. वडिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आपली अडचण झाली आहे काय, असे विचारले असता ते म्हणाले, आपली काही अडचण झालेली नाही. माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला काही जाणवते काय? आपले ध्येय निश्चित आहे. त्यादृष्टीने माझे काम सुरू आहे.