‘जाहीरपणे माफी मागितल्याशिवाय मी नवज्योत सिंग सिद्धूंची भेट घेणार नाही’

panjab

नवी दिल्ली- पंजाब कॉंग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी धुसफूस सुरु आहे. काँग्रेस हाय कमांडने नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष केले आहे आणि हा वाद संपल्याचे जाहीर केले असले तरीही पक्षात धुसफूस सुरूच असल्याचे दिसत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात सुरू असलेल्या वाद अद्याप कायम असल्याचे दिसत आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष केल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडून हे स्पष्ट करण्यात आलं आहे की सिद्धू यांनी माफी मागितल्याशिवाय ते कोणतीही बैठक घेणार नाहीत.मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचे माध्यम सल्लागार रवीण ठुकराल यांनी पंजाबमधील सध्या सुरू असलेल्या वादाबाबत सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांच्यात झालेल्या बैठकीच्या चर्चांना फेटाळून लावले.

त्यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, “नवज्योतसिंग सिद्धू यांनी अमरिंदरसिंग यांना भेटण्यासाठी वेळ मागितल्याची बातमी पूर्णपणे चुकीची आहे. कोणतीही वेळ मागितलेली नाही. सिद्धू यांच्या वृत्तीत कोणताही बदल नाही. सिद्धू हे सोशल मीडियावर केलेल्या अपमानजनक वक्तव्यांबद्दल जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची जाहीरपणे माफी मागत नाहीत तो पर्यंत कोणतीही भेट होणार नाही.”

दरम्यान, मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पंजाबचे प्रभारी हरीश रावत यांच्यासमोर नवज्योतसिंग सिद्धू यांनी माफी मागण्यासाठी अट घातली होती. सिद्धू यांनी त्यांच्यावर केलेल्या अपमानकारक वक्तव्यांबद्दल जाहीरपणे माफी मागावी, असे त्यांनी म्हटले होते.

महत्त्वाच्या बातम्या

IMP