fbpx

मी भाजप सोडून कुठेही जाणार नाही! चर्चेनंतर सिन्हांच स्पष्टीकरण

bjp-lotus

पाटणा: माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी भाजपाला राम राम करत भाजपला मोठा झटका दिला. यशवंत सिन्हा यांनी पार्टी सोडण्याचे जाहीर केल्यानंतर खासदार शत्रुघ्न सिन्हा हे पक्षाला रामराम करणार ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र ‘राष्ट्रमंच’च्या अधिवेशनामध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी आपण भाजप सोडून कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

काय म्हणाले शत्रुघ्न सिन्हा ?

‘२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये तिकीट मिळणार नाही म्हणून मी भाजपला सोडचिठ्ठी देत आहे अशा अफवा सध्या सुरू आहेत. मी भाजप सोडून कुठेही जात नसल्याचे स्पष्ट करत आहे.’

भाजपाला झटका! यशवंत सिन्हा यांचा भाजपाला राम राम

भाजपला आणखी एक मोठा झटका बसला आहे. माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी भाजपाला राम राम केला आहे. यशवंत सिन्हा यांनी देशासाठी राष्ट्रमंच स्थापन करण्याची घोषणा केली तसेच मी आजपासून राजकारणातून संन्यास घेतो आहे. माझे भाजपासोबत असलेले सगळे नाते मी तोडून टाकतो आहे असेही सिन्हा म्हणाले, ते बिहारमधील पाटणा या ठिकाणी झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

देशातील सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. विरोधकांना काहीही किंमत उरलेली नाही त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही त्यामुळे देशात लोकशाही असे वाटत नाही असाही टोला यशवंत सिन्हा यांनी लगावला आहे. यापूर्वी त्यांनी अनेक सभांमध्ये भाजपविरोधी भूमिका घेतली होती. येत्या काळात कोणतेही राजकीय पद स्वीकारणार नाही असेही त्यांनी जाहीर केले.