मुंबई : आगमी निवडणूकांचं वारं हळूहळू राज्यात घुमू लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. येत्या आगामी निवडणूका मनसे पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं समजतं आहे. आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये बैठक पार पडली. यावेळी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना स्वबळावर निवडणूक लढवण्याचं जाहीर करत, तयारीला लागा, असे आदेशही ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी बंधू उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
मी तुम्हाला म्हणजे तुम्हालाच सत्तेच्या खुर्चीवर बसवणार आहे. मी स्वतः सत्तेच्या खुर्चीवर उडी मारून बसणार नाही, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. तसेच, आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी करा, असे आवाहन त्यांनी मनसैनिकांना केले. निवडणूक लढण्यासाठी लागणारा पैसा आपण उभा करु असंही ते म्हणाले. राज ठाकरेंनी यावेळी पदाधिकाऱ्यांना सहा ‘एम’चा फॉर्म्यूला दिला. मेसेज, मेसेंजर, मनी, मसल, माईंड आणि मेकॅनिक्स या सहा ‘एम’वर लक्ष केंद्रीत करण्यास पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे.
तसेच, दसरा मेळावा लोकांनी ऐकलाच नाही. तिथे फक्त चिखलफेक होत होती, कोणतेही विचार मांडले नाहीत. त्यामुळे आपले सकारात्मक तसंच हिंदुत्वाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवा. मी तुम्हालाच सत्तेच्या खुर्चीवर बसवणार. मी सत्तेच्या खुर्चीवर उडी मारुन बसणार नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज ठाकरे कॊणत्या पक्षासोबत जाणार याबाबत अनेक चर्चा ऐकायला मिळत होत्या. मात्र राज ठाकरे यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे. यापूर्वी जी विधाने आणि बातम्या आल्या, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. आपण स्वबळावरच निवडणुका लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आताच्या राजकारणाला लोक कंटाळली आहेत. सध्या घाणेरडं राजकारण चाललं आहे. सध्याच्या घाणेरड्या राजकारणाला पर्याय म्हणून लोकं आपला विचार करतील. त्यामुळे सकारात्मक विचार ठेवा, लोकांपर्यंत पोहोचा, असा कानमंत्रही त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.
महत्वाच्या बातम्या :
- Viral Video | ‘या’ मुलाचा अतरंगी डान्स बघून व्हाल थक्क! पाहा व्हिडिओ
- Ram Kadam । “बाळासाहेबांचे दुश्मन आजही उद्धवजींना अति प्रिय”; राम कदम यांचा ठाकरेंवर निशाणा
- Raj Thackeray | राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे गट वाद सुरु असताना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले ‘हे’ आदेश
- Urfi Javed | बोल्ड अंदाजासह ‘उर्फी जावेद’चे नवीन गाणे रिलीज
- Kishori Pednekar | ‘मशाल’ चिन्ह मिळाल्यानंतर किशोरी पेडणेकरांचा शिंदे गटाला इशारा, म्हणाल्या…