मी राजकारणात प्रवेश करणार नाही- मीरा सुरेश कलमाडी

पुणे-  आपण कोणत्याही परिस्थितीत राजकारणात प्रवेश करणार नाही. परंतु  सामाजिक कार्य चालूच ठेवणार असून , जमेल तेवढी जनतेची सेवा करणार आहे. असे मत सौ. मीरा सुरेश कलमाडी यांनी एका कार्यक्रमात सांगितले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव संजय बालगुडे यांनी माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी व माजी मुख्यमंत्री स्वातंत्र्य सैनिक कै.  वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त दिनांक ३१ ओक्टोम्बर ते दिनांक १९ नोव्हेंबर दरम्यानच्या काळात पुणे शहरात १०० ठिकाणी रक्तदान शिबीर  आयोजित केले होते. या रक्तदान शिबिरात सुमारे १ ,८०० बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. या रक्तदान शिबिरात रक्तदान शिबीर आयोजित करणाऱ्या संयोजक व कार्यकर्त्यांचा सौ. मीरा कलमाडी यांच्या हस्ते इंडियन मेडिकल असोसिएशन च्या डॉ . नितु मांडके सभागृहात खास सन्मान करण्यात आला. आपले मनोगत व्यक्त करताना सौ. मीरा कलमाडी  यांनी आलेल्या सर्व रक्तदान करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानले व त्यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी अभय छाजेड, डॉ. सतीश देसाई, सदानंद शेट्टी आदी ,मान्यवर उपस्थित होते.

You might also like
Comments
Loading...