भाजपमध्ये प्रवेश करण्याचा माझा कोणताही विचार नाही : अल्पेश ठाकोर

टीम महाराष्ट्र देशा : येत्या निवडणुकीच्या तोंडावर गुजरात मधील कॉंग्रेस पक्षाचा आकृतीबंध काहीसा बिघडलेला दिसत आहे. कारण अनेकांनी ऐन निवडणुकीच्या धडाक्यात कॉंग्रेसचा हात सोडत भाजपला जवळ केलं आहे. त्यामुळे गुजरातमधील काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकोर हे कॉंग्रेसकडून दिल्या जात असणाऱ्या वागणुकीवर नाराज असल्याने भाजप मध्ये प्रवेश करत असल्याची चर्चा गुजरात मध्ये होती. पण भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याची माहिती आमदार अल्पेश ठाकोर यांनी दिली आहे.

यासंदर्भात बोलताना आमदार ठाकोर म्हणाले की , मी काँग्रेस पक्ष नेतृत्वावर नाराज आहे. पण भाजपमध्ये प्रवेश करण्याचा माझा कोणताही विचार नाही. तसेच गुजरात काँग्रेसमध्ये ज्याप्रकारे काम चालू आहे. त्यावर आपण नाराज आहोत. पक्षाध्यक्षांच्या कानावरसुद्धा ही बातमी घातली आहे, असं ठाकोर म्हणाले आहेत.त्यामुळे ठाकोर यांच्या भाजप पक्ष प्रवेशा बाबतच्या चर्चांना तूर्तास तरी ब्रेक लागला आहे.

Loading...

दरम्यान गुजरातमध्ये काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी आमदार जवाहर चावडा यांनी विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांची भेट घेत आपल्या पदाचा राजीनामा सोपवला. काँग्रेसला रामराम केल्यानंतर चावडा हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच आणखी ६ ते ७ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'