fbpx

मी नाही निवडणार काँग्रेसचा नवा अध्यक्ष : राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेस अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर राहुल गांधी ठाम असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. त्यामुळे पक्षाला लवकरच या पदासाठी नवी निवड जाहीर करावी लागणार आहे. आज राहुल गांधी यांनी स्वत:च या गोष्टीवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आता काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असणार? आणि कधीपर्यंत नव्या अध्यक्षांची निवड जाहीर होणार? यावर सर्वत्र चर्चा सुरु आहे.

राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीकडे पक्षाध्यक्षपदाच्या राजीनामा सोपवल्यापासून २६ दिवस उलटलेत. परंतु नवा काँग्रेस अध्यक्ष कोण होणार? याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. नवभारत टाईम्स या वृत्तपत्राने अशोक गहलोत हे पुढील काँग्रेस अध्यक्ष होतील, अशी बातमी प्रसिद्ध केली. परंतु तूर्तास तरी पक्षात अशी कुठलीही हालचाल नसल्याचे राहुल गांधींनी स्पष्ट केले आहे. तसेच नव्या काँग्रेस अध्यक्षांच्या निवडीत माझी कोणतीही भूमिका नसेल, हे देखील राहुल यांनी स्पष्ट केले आहे.