मी फार काळ संरक्षणमंत्रीपदावर नसेन – अरुण जेटली

Arun Jaitley

नवी दिल्ली : मी फार काळ संरक्षणमंत्रीपदावर नसेन, असे सूतोवाच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज केले. येथे आयोजित एका परिषदेदरम्यान ते बोलत होते.ते म्हणाले की, देशातील बँकांचे कर्ज थकवणाऱ्या खासगी कंपन्यांनी एकतर कर्ज फेडा किंवा कंपनी विका. आम्हाला देशात जास्त बँका नको आहेत. आम्हाला मोजक्याच पण भक्कम आर्थिक परिस्थिती असलेल्या बँकांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकार बँकांना जास्तीत जास्त भांडवल उपलब्ध करुन देण्यास तयार आहे. मात्र कर्ज थकवणाऱ्यांकडून वसूली करणे ही सरकारची प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणाचेही त्यांनी यावेळी समर्थन केले.