राष्ट्रवादी काँग्रेसला सोडणं शक्य नाही, वावड्यांकडे लक्ष देऊ नका : संग्राम जगताप

टीम महाराष्ट्र देशा: अहमदनगरचे राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार संग्राम जगताप शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहे. जगताप यांच्या शिवसेना प्रवेशाच्या वृत्तामुळे स्थानिक शिवसैनिक अस्वस्थ झाले आहेत, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये देखील कुजबुज सुरु आहे. स्वतः संग्राम जगताप यांनी मात्र सोशल मीडियावरील वावड्यांकडे लक्ष देऊ नका, असे म्हंटले आहे.

सोशल मिडीयावर चर्चा करणाऱ्यांकडे भरपूर वेळ असल्याने ते अशा वावड्या उठवतात. नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिन्ही आमदारांबद्दल चर्चा घडवली जात आहे. आपण काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आपल्यासाठी अनेक सभा घेतल्या, त्यामुळे राष्ट्रवादीला सोडणं शक्य नाही, असं जगताप म्हंटले आहे.

पुढच्या पक्षातील लोकच चर्चा सुरु करतात. विनाकारण चर्चा करून महत्त्व वाढवून घेण्याचे काम केले जात आहे, असंही संग्राम जगताप म्हणाले.