fbpx

मी नेतृत्त्व करून बारामती नगरपालिका ताब्यात घेईन; महाजनांचा अजित पवारांवर पलटवार

जळगाव | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलेलं आव्हान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी स्विकारलं आहे. जेव्हा बारामतीची निवडणूक लागेल तेव्हा निश्चित तिथले नेतृत्त्व मी घेईल आणि बारामती नगरपालिका ताब्यात घेईन, असा जोरदार पलटवार महाजन यांनी अजित पवारांवर केला आहे.

राष्ट्रवादीच्या परिवर्तन सभेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याच स्टाईलमध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा समाचार घेतला होता. त्यावर जोरदार पलटवार महाजन यांनी अजित पवारांवर केला आहे.

मध्यंतरी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ‘मला पक्षाने जबाबदारी दिली तर पवारांची बारामती देखील जिंकून दाखवू’, असे विधान एका जाहीर कार्यक्रमात केले होते. त्यावर बारामती काय आहे ते माहिती आहे का ? बारामतीत या तुम्हाला दाखवतोच, अशा शब्दात अजित पवार यांनी गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

त्याबाबत अजून बोलताना अजित पवार म्हणाले, “बारामती काय आहे ते माहिती नाही आणि चालले बारामती जिंकायला. बारामतीच्या लोकांनी आमच्यावर निस्सीम प्रेम केलं आहे. गेल्या 50 वर्षांपासून बारामतीकर आम्हाला निवडून देत आहेत. पवार साहेबांना आणि मला बारामतीतून निवडून दिले जात आहे. असे असताना महाजन सांगतात की बारामती जिंकून दाखवू. ते एवढं सोपं आहे का? तरीही इच्छा असेल तर जरूर बारामतीत या”, असे खुले आव्हानही अजित पवार यांनी गिरीश महाजन यांना दिले