fbpx

‘राजसाहेबांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतल्यास मला आनंदच होईल’

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढता पाय घेतला असला तरी राज ठाकरे राज्यातल्या प्रमुख मतदार संघांमध्ये जावून पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात प्रचार करणार आहेत. ठाकरे यांनी या लोकसभा निवडणुकीत न उतरता भाजप विरोधात प्रचार करणार असल्याचे ठरवले आहे.

दरम्यान, राजसाहेबांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतल्यास मला आनंदच होईल. राज ठाकरेंची सभा नकोय, असं कुणाला वाटल ? असे म्हणत कॉंग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार उर्मिला मांतोडकर यांनी राज ठाकरेंना सभेसाठी निमंत्रण दिले आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे.

मनसेने भाजपला पाडण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पक्षांना मदत करण्याचा निश्चय केला आहे. याचा फायदा सहाजिकच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होणार आहे. याच संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न अनेक उमेदवार घेत असून अनेकजण आपल्या मतदारसंघात ठाकरे यांची सभा आपल्या मतदारसंघात व्हावी यासाठी प्रयत्न करताना पहायला मिळत आहेत.