पंढरपूर : मराठा समाजानंतर आता धनगर समाज देखील आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. धनगर समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करुन आदिवासी समाजाच्या सवलती तातडीने लागू कराव्यात, अशी धनगर समाजाची मागणी आहे. या मागणीसाठी आज पंढरपुरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली ‘ढोल बजाव, सरकार जगाव’ हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी ढोल वाजवून जर सरकारला जाग आली नाही, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर आंदोलन करणार, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.
पहा व्हिडिओ :
महत्वाच्या बातम्या :
- अजितदादा म्हणतात वरिष्ठांचं ऐकूनच ‘ते’ ट्विट डिलीट केलं…
- हीच काळाची गरज, आत्ताच हवे भंडाऱ्यात वैद्यकीय महाविद्यालय.. ही मागणी करणारे आहे तरी कोण
- ‘त्या’ तोकड्या मानधनात जीव धोक्यात घालून घरोघरी सर्वेक्षण करतात, पण त्यांच्या मागण्यांची कोणी दखलच घेतली नाही, अखेर…?
- सोयाबीन पिकविणाऱ्या बळीराजाला सरकारने द्यावी हेक्टरी २५ हजारांची मदत
- ‘गोपीचंद पडळकरांच्या दादागिरीला भीक घालणार नाही’