फडणवीस उच्च विभूषित! त्यांना मी काय ट्युशन देणार -अजित पवार

Dev fadnvis and ajit pawar

पुणे: फडणवीस उच्चविभूषित आहेत त्यांना मी काय ट्युशन देणार ? असा प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. ते आज पुण्यात पत्रकारांसोबत बोलत होते.

“माझ्या बहिनेनी मोठ्या लाडाने मुख्यमंत्र्यानी माझ्याकडून ट्युशन घ्यावी हे संगीतल, त्यावर मीही ट्युशन देयला तयार असल्याचं सांगितलं. मात्र, फडणवीस उच्चविभूषित आहेत त्यांना मी काय ट्युशन देणार ?” असे अजित पावर यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे ?

एखादा विद्यार्थी एकाच वर्गात तीन – तीन वर्ष बसून अभ्यास करत असेल, आणि तरीही तो पास होत नसेल, तर त्याला आपण ट्यूशन लावतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तीन वर्ष झाली तरी ते अजून अभ्यासच करत आहेत. त्यांना खऱ्या अर्थाने ट्यूशनची गरज आहे. राज्यात अजित पवारांसारखी चांगली ट्यूशन कोणीच घेत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे ट्यूशन लावावी.