भारताची फसवणूक करण्यापूर्वी मी जीव देईल- मोहम्मद शमी

टीम महाराष्ट्र देशा-  मी कुणाचीही फसवणूक केलेली नाही. हसीन माझ्यावर असे आरोप का करत आहे, हे मला माहिती नाही. तिच्या आरोपांमुळे मी आणि कुटुंबियांना धक्का बसला आहे. तिने देशाला फसवल्याचा आरोप माझ्यावर केला आहे. भारताची फसवणूक करण्यापूर्वी मी जीव देईल. असं स्पष्टीकरण भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने केलेल्या आरोपानंतर दिले आहे.

हसीन जहाँने दाखल केलेल्या तक्रारीवरुन कोलकाता पोलिसांनी शमीविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद केली आहे. हिंदुस्थान टाईम्स या वृत्तपत्राने यासंदर्भातलं वृत्त दिलेलं आहे. मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने कोलकात्याच्या लाल बाझार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शमीचे इतर मुलींसोबत अनैतिक संबंध असून त्याने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार हसीन जहाँने केली होती. या तक्रारीवरुन पोलीसांनी शमीविरोधात ३०७, ४९८ अ, ५०६, ३२८, ३४ आणि ३७६ या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हसीन जहाँने मोहम्मद शमीवर केलेले गंभीर आरोप –

  • शमीचे इतर मुलींसोबत अनैतिक संबंध असून त्याने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप .
  • हसीनने त्याच्यावर देशाची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
  • शमीची पाकिस्तानमध्येही त्याची एक प्रेयसी आहे. तिच्याबरोबर त्याने दुबईमध्ये काही काळ व्यतित केला आहे, असा आरोपही हसीनने केला होता.
  • शमीवर मॅच फिक्सींग आणि देशाची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
  • शमीने पाकिस्तानच्या अलिशबा या प्रेयसीकडून काही पैसे घेतले होते. या गोष्टीचे पुरावेही माझ्याकडे आहेत. तो जर मला फसवू शकतो, तर तो देशाचीही फसवणूक करू शकतो, असा गंभीर आरोप हसीनने शामीवर केला आहे.
  • शमीने सातत्याने आपला शारीरिक आणि मानसिक छळ केला.
  • दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन परतल्यानंतरही त्याने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप.
  • शमी अनेक महिलांसोबत अश्लील चॅट करायचा.