‘वंजारी समाजाला वाढीव आरक्षण मीचं मिळवून देणार’

pankaja munde

टीम महाराष्ट्र देशा : बीडच्या पालकमंत्री आणि राज्याच्या महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी वंजारी समाजाच्या वाढीव आरक्षणाविषयी मोठ विधान केले आहे. त्यांनी ‘हा घाईत घेण्याचा निर्णय नाही, अभ्यासपूर्ण आरक्षण मीच मिळवून देईल असं विधान एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना केले आहे.

पंकजा मुंडे यांनी राज्यभरात वंजारी समाजाकडून वाढीव आरक्षणासाठी मोर्चे काढले जात आहेत. याविषयी त्यांनी अद्याप भाष्य केले नव्हते. त्याविषयीच्या प्रश्नावर उत्तर देताना अजून यावर कुणीही प्रश्न विचारला नव्हता. आज प्रश्न विचारलाच आहे, तर यात लक्ष घातलेलं आहे आणि अभ्यास करुन भाष्य केलं जाईल असं उत्तर दिले.

याविषयी पुढे बोलताना आरक्षणासाठी मुंडे साहेबांनीही समाजाला रस्त्यावर येऊ दिलं नाही आणि मीही येऊ देणार नाही. हा घाईत घेण्याचा निर्णय नाही, अभ्यासपूर्ण आरक्षण मीच मिळवून देईल. यामध्ये कायदेशीर बाबी पाहाव्या लागतात आणि एक अभ्यास गट यासाठी स्थापन केला आहे अशी अशी माहिती दिली आहे. त्यामुळे याविषयी लवकरच तोडगा निघेल अशी आशा आहे.

दरम्यान, वंजारी समाज सध्या एनटी या प्रवर्गात समाविष्ट आहे. या वर्गात अ, ब, क, ड असे चार भाग आहेत. या प्रवर्गाला १० टक्के आरक्षण आहे. त्यात या समाजाला फक्त २ टक्के आरक्षण वाट्याला येते. त्यामुळेच वंजारी समाज वाढीव आरक्षणाची मागणी करत आहे.